Saturday, February 26, 2011

आज तिचा शेवटचा दिवस होता,

आज तिचा शेवटचा दिवस होता,
आज तिचा शेवटचा दिवस होता, खूप समजून सांगितले, नका जाऊ. अजून थोडे दिवस वाट बघा... पण तिचा निर्णय पक्का होता.. डीपार्टमेंट बदलून घ्याला पण तयार नव्हती..शेवटी जॉब सोडलाच तिने...
मी ऐक छोटीसी भेट दिली..... खूप वेळा आभार मानले..
कितीतरी वेळ मी नुसता बसून होतो.. नंतर खूप जण भेटले पण मला काही सुचत नव्हते .. तिला आता मी धरून तर ठेऊ शकत नव्हतो. ऑफिस सुटायला अजून वेळ होता.. ती खूप वेळा माझ्याकडे आली... मी पण तिच्या कडे गेलो होतो... तिला सांगितले call करा मला.. मला काय करावे सुचत नव्हते... ती जाणार म्हणून कसेतरी झाले होते की रोज दिसणार नाही म्हणून ??
खरच ऑफिस ला जास्त काम असेल , तर तीच असी होती की तिला पाहून कामाचा विसर पडत असे..
एकदा ती म्हणाली होती.. "मित्रांना सांगून problems सुटत नाहीत पण त्यावर उपाय नक्की सापडतो"

हिरवा तिचा आवडता ड्रेस घालून आली होती (माझा पण आवडता होता तो ड्रेस आणि ...)
पण तिचा चेहरा लपवू शकत नव्हता की आज तिचा ऑफिस चा शेवटचा दिवस आहे. खूप कसेतरी वाटले.
ऑफिस च्या बाहेर मी कितीतरी वेळ उभा होतो.. ५.३० होऊन गेले होते... रोज तिच्यासाठी गाडी लवकर निघावी असे वाटायचे
आज तिने जाऊ नये असे वाट होते..

जाताना तिने कितीवेळा मागे पाहिले .... इशारा करत होती.. "मी call करते म्हणून".. आंणी मी नक्की करा असे सांगत होतो..


--

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
This message is provided for informational purposes and should not be construed as a solicitation. You are hereby notified that any dissemination, distribution, or copying of this communication or use of the information contained herein upload, post, email, transmit or otherwise make available any Content that is unlawful, harmful, threatening, abusive, harassing, tortious, defamatory, vulgar, obscene, libelous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable is strictly prohibited.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...