Saturday, February 26, 2011

21 मार्च १० "माझ्या छातीत दुखतेय" ..

21 march 10

रविवार...

असे का म्हणालात...देवाकडे काहीतरी मागा.. "माझ्या छातीत दुखतेय" ..

एस टी बस stand वर थांबलो आधी नाश्ता करून घ्यावा म्हणून छोट्या हॉटेल मध्ये बसलो होतो.
त्यांचा फोन आला.
"गुड मोर्निंग ... विसरलात की काय आम्हाला ?
डोसे बनवितेय. म्हंटल सांगावे नाहीतर पोटामध्ये दुखायचे ."
मी:" नाश्ता करतो, चितळे बाखरवडी आणि आता वडापाव ."
त्या: "सांगू का कसे बनवायचे आपण पापड करतो भातावड्या करतो ना वतीने तश्या"
खूप बोलून बोलून झाले. नाश्ता जरा जास्त गोड लागत होता.


मंदिरा मध्ये दर्शन घेतो आहे ...

मुख्य प्रवेश पासून आधी हॉटेल आणि किनाऱ्यावरून जाणारी मोठ्ठी वाट आहे. पश्चिमेकडे तोंड असलेले खूप मोठे मंदिर आहे.
मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास मंदिराच्या डाव्या बाजूला सीता राम (लक्ष्मण) हनुमान यांचे दर्शन होते. आतमध्ये दोन भाग आहेत. महिलांना फक्त पहिल्या भागामध्ये प्रवेश आहे. तिथे एक बाळकृष्ण छान बसला होता, उठून आपल्याशी बोलायला लागेल असा. एक पाळणा हलवत ठेवला होता का ते समजले नाही. सगळे त्याला थोडा थोडा हात लाऊन हलवत होते. पहिला भाग संपला डावीकडे बाहेर पडून पुन्हा आत जावे लागते. मंदिराच्या मागच्या भागात दर्शन झाले ते राधा कृष्ण यांचे. डावीकडून श्री हरी कृष्ण महाराज, कृष्ण, राधा, श्री घनश्याम श्री अक्षर पुरुषोत्तम महाराज भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्री स्वामीनारायण महाराज, अक्षरब्रम्ह गुणातितानंद स्वामी.
खूपच छान वाटते अगदी शांत. डावीकडून बाहेर पडून प्रदक्षिणा घालता येते. बाजूला आणखी एक Parking आणि मागे खूप मोठी इमारत आहे. आणखी काही सेवकांच्या राहण्याच्या जागा असव्यात. आत अजून खूप आहे ते स्वतः जाऊन पाहण्यासारखे आहे .

हे सगळे पाहत असताना तुमचा फोन...
"माझ्याशी बोला न मला तुमची खूप आठवण येतेय" बोला न गप्प का. मग राहू द्या "

मी: मी खूप मोठ्या मंदिरात आहे. तुम्ही पण पहा. मी आत ठेऊ का?
ति: नको का हो मला तुमची खूप आठवण येतेय. मग माझ्यासाठी मागाल का?
मी: हो.
ति: .....देवाकडे काहीतरी उपाय मागा .. "माझ्या छातीत दुखतेय" ..
मागाल ना please please please ........


आता कोणाकडे काय मागायचे आणि कसे मागायचे मी विसरून गेलो होतो

No comments:

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...