रविवार...
Shri Swaminarayan Mandir (BAPS)Shri Akshar Purushottam TirthsthalPost. Kosamba, Valsad,Gujarat, INDIA - 396001
Tel:
(02632) 248 610, 248348, 99989 92800
Fax:
(02632) 247 347
दमन च्या एस टी बस stand वर थांबलो आधी नाश्ता करून घ्यावा म्हणून छोट्या हॉटेल मध्ये बसलो होतो.
त्यांचा फोन आला.
"गुड मोर्निंग ... विसरलात की काय आम्हाला ?
डोसे बनवितेय. म्हंटल सांगावे नाहीतर पोटामध्ये दुखायचे ."
मी:" नाश्ता करतो, चितळे बाखरवडी आणि आता वडापाव ."
त्या: "सांगू का कसे बनवायचे आपण पापड करतो भातावड्या करतो ना वतीने तश्या"
खूप बोलून बोलून झाले. नाश्ता जरा जास्त गोड लागत होता.
बाहेर आलो उन वाढले होते. समोर राजीव गांधी सेतू दिसत होता. बाजूला दमन च्या एस टी बस stand ला थांबलो.
एक बस गेली. मी आज फिरायाल जाताना पहिल्यांदा BAG घायला विसरलो होतो. जरा वेळ लागला पण वलसाड साठी बस मिळाली.
समोर एक छान गोरी गोरी गुजराती मुलगी बसली होती. तीच माझ्यावर IMPRESSION टाकायचा केविलवाणा प्रयत्न करत होती. तिला काय माहित सकाळी सकाळी मला कोणी गोड मुलीने कुठे तरी दूर नेऊन ठेवले होते. असो. आता बस ने आवाज काढला. आणि त्या मुलीने कानात बोटे घातली. दहा वाजून गेले होते बस ने दमन मागे सोडले गुजरात मध्ये प्रवेश केला . आणि अचानक बस थांबली. सगळे बाहेर पाहू लागले. पण काही नव्हते समोर रस्त्याचे काम चालले होते मला पुणे म न पा ची आठवण झाली. बस ने रस्ता सोडून बाजूच्या वडाच्या झाडाला एक मस्त वळसा घातला आणि परत रस्त्यावर आली. पुढे मग खडकी रेल वे crossing सारखे दिसणारे crossing आले . उदवाडा असे गाव चे नाव होते. तिथून मग मुंबई अहमदाबाद महामार्ग चालू झाला . बस ने परत मोठा आवाज काढला आणि त्या समोरच्या मुलीने कानात रुमालासह बोटे घातली (स्वतःच्या). काही वेळाने बस पेट्रोल पंपावर थांबली. आता इथे काय करायचे?
वाहक: "बस १५ मिनिट रूकेगी. सब लोग नीचे उतरो"
आम्ही: कोणत्या मुहूर्तावर बस पकडली देव जाने!!
तेवढ्यात त्या समोरच्या मुलीने पेन मागितला. मान वाकडी करून मोबईल वर बोलत
"पेन आपो नि"
आणि गोऱ्या हातावर लिहू लागली.
आम्ही तिच्या सकट सगळे खाली उतरलो. सगळा पेट्रोल पुम्प पाहून झाला तर समजले बस मध्ये CNG GAS भरायचा आहे म्हणून सगळ्यांना खाली उतरावलेय . वाहक गेले आणि सगळ्या प्रवासी लोकांना पाणी पाजले. तोपर्यंत आम्ही आमचे आणि आजूबाजूचे (तिचे) फोटो काढले.
झाले एकदाचा gas भरून झाला आणि बस मार्गाला लागली. वलसाड जवळ आले. आणि आधी एक बस थांब्याजवळ ति उतरली.
चाळीस किलोमीटर साठी दीड तासाचा कालावधी लागला होता. उतरून परत जाण्याची बस कधी असते विचारून झाले. मग कोणते तरी फळ खाऊन झाले. थोडी दुकाने फिरलो. वलसाड तसे मोठे आहे. हनुमान मंदिर दर्शन झाले.
एका गोल गोल माणसाला विचारले "गुजराथी थाळी कहा मिलेगी"
आणि मग त्या दिशेने चालू लागलो.
"पुरोहित थाळी" असा फलक दिसला आणि पुण्यातल्या सुवर्णरेखा मधील थाळी ची आठवण झाली. काय मस्त बेत झाला सांगू. WINDOW मध्ये बसून जेवण केले. अगदी पोटभर. मालकांनी श्रीखंड मागवले. तिथे बसून मला समोरचे उडुपी हॉटेल दिसत होते आणि खाली मोठा रस्ता होता. बहुतेक वलसाड मधील MAIN ROAD असावा. शेजारी मारवाडी सह कुटुंब बसले आणि आम्ही जेवण आवरते घेतले. आता डोळ्यावर झोप आली. बाहेर भेळ, मेदू वडे, ढोकला (खमण) सगळे विकणारा फेरीवाला आला. त्याचा आणि त्याच्या M 80 चा फोटू काढलाच!!.
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454058873100163346
डोळ्यावर थोडी झोप पांघरून एका AUTO मध्ये बसलो आणि एकदाचा तिथल समुद्रकिनारा दिसला. पाणी आज जास्त होते. स्थानिक लोक जास्त होते. आता बाकी आणखी कोण असतात ते सांगायला नकोच. SPEED BOAT फिरत होती. दुपारचे २.३० होऊन गेले होते. उन्हे कलली होती. त्या SPEED BOAT वर बसून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454058910190620594
एका छान टपरी वजा दुकानामध्ये नारळ पाणी (शहाळे) घेतले . आणि पैसे वसूल व्हावेत म्हणून अगदी एक तास तिथेच बसलो. Fresh होऊन किनाऱ्यावरून डावी कडे चालायला सुरुवात केलो. काही लोक सहकुटुंब पाण्यात अगदी नाचत होते. एक दीड किलोमीटर चालायचे होते. किनाऱ्यावरील वाळू मध्ये पाय रुतून वेळ वाढत होता. थोडे पुढे LOVERS POINT (Privacy Point) होता. नजरेत बसतील तेवढे पाहत होतो. ति त्याच्या कुशीत छान झोपली होती. आणि आणखी एक प्रेयसी तिच्या प्रियकराचा चेहरा समोर घेऊन केसात हात फिरवत होती. असो आपल्याला मंदिरात जायचे आहे विसरा ते असे मनाला खूप वेळा सांगून झाले.
एकदाचा तो मला आवडणारा आणि न आवडणारा प्रवास संपला आणि मोठ्ठे साईबाबांचे मंदिर दिसले. उन्हामुळे गरम झालेले पाय धुवून मंदिरात गेलो खूप छान आहे ते।
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454058919882595202
बाजूला आणखी एक नवीन मंदिर झाले होते. तिथे जाऊन आलो आतमध्ये अजून काम चालू होते.
आता परत डावीकडे चार किलो मीटर चालायचे का? मग ऑटो केली. मध्ये जाताना एक जैन मंदिर लागते. परत तोच पाहिलेला beach , chowpati , आणि काही प्रेक्षनिय स्थळे पाहून पुढे निघालो. समुद्र किनारी थोडा उंचीवर असलेला साडे तीन मीटर चा रस्ता बाजूला झाडी, त्यात नारळ खजूर, ताड माड, आणि मोठ्या बोराची झाडे असे छान LOCATION मनाला आवडून गेले. इथे कोणाची तर आठवण आल्याशिवाय राहत नाही. AUTO थांबली. तिथे चार वाजून गेले होते चहाची वेळ झाली होती. (office ची सवय!!). फक्त चहा घेतला
. "आणखी एक चहा घ्यायचा का?"
घेतला असा परत घेतलेला चहा आणखी गोड लागतो तो पिल्यानंतर समजतो एकदा पिऊन पहाच.
स्वामीनारायण मंदिर, पुस्तकांचे प्रदर्शन , बाग, नारळाची झाडे, बाजूला छान सिमेंट चे कुंपण त्यावर लहान लहान दिवे, एक मोठे हॉटेल कम fast फूड center , लहान मुलांना खेळायला झोपाळे (यावर मोठ्या कार्ट्या पण बिनदास्त झोके घेत होत्या) , Parking , आणि या सगळ्यासमोर अथांग पसरलेला समुद्र!!... हे सगळ चहा पिताना दिसत होते.
(तसे आजू बाजूला आणखी खूप सोंदर्य होतेच)
मुख्य प्रवेश पासून आधी हॉटेल आणि किनाऱ्यावरून जाणारी मोठ्ठी वाट आहे. फोटो मध्ये दिसतेय ती।
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454059658977131042
मंदिर खूप आवडले. पश्चिमेकडे तोंड असलेले खूप मोठे मंदिर आहे.
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454059693960058850
मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास मंदिराच्या डाव्या बाजूला सीता राम (लक्ष्मण) हनुमान यांचे दर्शन होते. आतमध्ये दोन भाग आहेत. महिलांना फक्त पहिल्या भागामध्ये प्रवेश आहे. तिथे एक बाळकृष्ण छान बसला होता, उठून आपल्याशी बोलायला लागेल असा।
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454059884150672146
एक पाळणा हलवत ठेवला होता का ते समजले नाही. सगळे त्याला थोडा थोडा हात लाऊन हलवत होते. पहिला भाग संपला डावीकडे बाहेर पडून पुन्हा आत जावे लागते.
मंदिराच्या मागच्या भागात दर्शन झाले ते राधा कृष्ण यांचे.
डावीकडून श्री हरी कृष्ण महाराज, कृष्ण, राधा, श्री घनश्याम श्री अक्षर पुरुषोत्तम
महाराज भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्री स्वामीनारायण महाराज, अक्षरब्रम्ह गुणातितानंद स्वामी.
खूपच छान वाटते अगदी शांत.
डावीकडून बाहेर पडून प्रदक्षिणा घालता येते. बाजूला आणखी एक Parking आणि मागे खूप मोठी इमारत आहे. आणखी काही सेवकांच्या राहण्याच्या जागा असव्यात. आत अजून खूप आहे ते स्वतः जाऊन पाहण्यासारखे आहे .
http://picasaweb.google.co.in/vikasbnale22/SwaminarayanTemple?locked=true#5454059686846661266
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
-
रविवार... Shri Swaminarayan Mandir (BAPS)Shri Akshar Purushottam TirthsthalPost. Kosamba, Valsad,Gujarat, INDIA - 396001 Tel: (02632) 248 61...
-
आज तिचा शेवटचा दिवस होता, आज तिचा शेवटचा दिवस होता, खूप समजून सांगितले, नका जाऊ. अजून थोडे दिवस वाट बघा... पण तिचा निर्णय पक्का होता.. डीपा...
-
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
2 comments:
Photo disat nastil tar login kara gmail var!!
http://www.swaminarayan.org/
Post a Comment