12 April
आज सकाळपासून करमत नाहीये, कोणाला सांगता येत नाही,... सांगितले तर म्हणतात तुझ की नेहमीच आहे असे असेल पण की नेहमी मला करमत नसते म्हणजे चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात. पण रात्री थोडा उशीर झाला होता झोपायला ११.३० म्हणजे उशीर माझ्यासाठी. (जेवण करणार होतो की नव्हतो सांगता येत नाही पण आधी त्यांचे शब्द आठवतात "आपल्या मैत्रीची शपथ आहे तुम्हाला उपाशी झोपायचे नाही"
पण त्यांच्याशी बोलून काही तास होऊन गेलेत. आवाज ऐकला नाही. बहुतेक ते पण कारण असेल. ऑफिस ला काम नव्हतेच. जेमतेम रुटीन चालू होते. पण जसी संध्याकाळ होऊ लागली तसी त्यांची आठवण जास्त येऊ लागली. त्या बोलायच्या वेळा MISS calls चे time आणि येणारा फोन. सगळ्या वेळा त्याच होता पण त्यांचा फोन नव्हता. माहितेय आज येणार नाही त्यांना सुट्टी आहे, हे मला माहितेय पण त्याला कोण सांगणार... त्याला म्हणजे माझ्या हृदयाला, मनाला, जे वेड होऊन वाट पाहत आहे कुणाच्या तरी गोड आवाजाची, त्याला सवय झालीये हो. खरच का त्याला सवय झाली. पाच वाजता तर डोळ्यात पाणी पण आले. इतकी आठवण नसते कोणाची, कोणाच्याही इतके जवळ जाऊ नये आत हे फक्त कविता आणि शब्दात राहिले आहे.
आज मंगळवार आहे.. कुठे आहात ...
मला खूप सांगायचे की आज नाही सहन होतंय... अगदी ओरडून सांगाव का अस झालाय.. खूप आठवण येतेय खूप...... I REALLY MISS U!!
माफ करा आठवण काढलीये मी पण तिकडे तुम्हाला त्रास नाही ना होत ... हा आणि सांगायला विसरलोय.. जेवण करून जाऊ नका .. फक्त थोडा नाश्ता करा.. दुपारी मग छान जेवण करा... आणि तुम्ही ति आवडती झोप जरा दूर ठेवा .
आणि काय... मी छान आहे . कश्या दिसत आहात म्हणजे वर्गात बसून paper सोडवताना.
आणि तिथे paper मध्ये एकदा तरी मी दिसलो का हे नक्की सांगा?
Saturday, February 26, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
-
रविवार... Shri Swaminarayan Mandir (BAPS)Shri Akshar Purushottam TirthsthalPost. Kosamba, Valsad,Gujarat, INDIA - 396001 Tel: (02632) 248 61...
-
आज तिचा शेवटचा दिवस होता, आज तिचा शेवटचा दिवस होता, खूप समजून सांगितले, नका जाऊ. अजून थोडे दिवस वाट बघा... पण तिचा निर्णय पक्का होता.. डीपा...
-
एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...
No comments:
Post a Comment