Saturday, August 14, 2010

नागपंचमी - - फलटण मध्ये पतंगपंचमी

नागपंचमी - - फलटण मध्ये पतंगपंचमी
नागोबाची पूजा केली का? वारूळ माहितेय का ?
फलटण ला आज मोठा पतंग उस्तव असतो. सगळ्या घरावर आणि नदीकिनारी सगळीकडे मुले, दोरा, आणि रंगीबिरंगी पतंग असतील. सकाळी off road ला or मोकळ्या रानामध्ये दोरा बनवायचा आणि मग पुरण पोळी खाऊन शहरामध्ये जायचे पतंग खेळायला
आणि महिला जातात खेळायला फुगडी असे काहीतरी आता नदीला छान पाणी असते. त्यामध्ये कोणी बुडणार नाही पण स्वच्छ असते खूप मस्त असते नदीच्या बाजूला दोनीकडे मंदिरे आहेत. थोडे पुढे कुंभार वीट कारखाना आहे . त्यांनी आणलेली माती टेकडी सारखी असते त्यावर मुले गटाने उभी राहतात. दर वर्षी तीच मुले त्याच ठिकाणी मागच्या वर्षीच्या दुसऱ्या गटाची वाट पाहत असतात . challenge असते .. एकदा पतंग वर सोडला की परत आणून दाखवायचा...

हो तर पण आम्ही अगदी गटाने जातो आणि मग जोरात ओरडत असतो... पतंग काय परत येत नाही
एकदा वर गेला की कोणाला तरी कापून लावतो आणि नंतर आपला पतंग पण कापून जातो...

आठ दिवस आधी काच बारीक करायची मग आदल्या दिवसी काच लाऊन (मांजा) दोरा तयार करायचा
नागपंचमी दिवशी पण ताजा काची दोरा करायचा त्याला मांजा म्हणतात, आणि मग दुपारी शहरात जायचे
तिथे शहरातली पोरे मुली असतात... त्यांना हरवायला मजा येते.. नुसते ओरडत असतात

गेले!!! आणि लावले !!
गेले!! म्हणजे आपला पतंग गेलेला असतो
लावले!!!!!! म्हणजे त्यांचा पतंग गेलेला असतो

आणि घरी येताना कोणाकडे काहीच नसते सगळ्यांचे पतंग आणि दोरा समप्लेला असतो
तरीपण एक आनंद असतो घसे दुखत असतात आणि डोळे पण घरी येताना पण मजेत आज कोणाचा मोठा पतंग कसा कापला आणि कसे ओरडलो.. मागच्या वर्षीची मुलगी दिसत नाही
नवीन कोण आलेय...कोणीतरी पुण्याचे आलेले असते नवीन दोरा घेऊन.. पण कसलाही दोरा असेल तरी तो टिकत नाही कारण आम्ही काच TUBELIGHT ची वापरतो घरामध्ये वापरतो ना पांढरी tube ती फोडून बारीक काच करायची अगदी पावडर.. आणि मग दोरयाला लावायची.
मधेच थोडासा पाऊस पडतो... पण मजा येते.. राहिलेल्या दोरयाचे काहीच करता येत नसल्याने संपवून मग घरी परततो. जोपर्यंत पतंग दिसतोय तोपर्यंत पतंग उडवीत असतात.. शेवटचा तर तोडून लावला जातो..







--
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
This message is provided for informational purposes and should not be construed as a solicitation. You are hereby notified that any dissemination, distribution, or copying of this communication or use of the information contained herein upload, post, email, transmit or otherwise make available any Content that is unlawful, harmful, threatening, abusive, harassing, tortious, defamatory, vulgar, obscene, libelous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable is strictly prohibited.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

Saturday, August 7, 2010

माझे बालपन

पहिली ते चवथी पर्यंत शाळेत ३० मुले होती आणि माझ्या वर्गात माझ्यासकट ६ मुले होती. खरच किती छान वाटत असे तेव्हा. शाळा आणि घर त्यापेक्षा बाहेर काही आहे हे देखील माहिती नव्हते. जाधव गुरुजी होते शिकवायला. इतिहास शिकवायला लागले कि कुठपर्यंत जातील सांगता येत नसे. मग हळूच सांगाव लागे "गुरुजी जेवणाची सुट्टी घायची का?"
मग त्यांनी सांगितलेले सगळे मी घरी जाऊन सापडेल त्याला सांगत असे. मला आठवत गोष्ठी सांगायला लागले कि आम्ही असे जीव कानात गोळा करून बसत असू. एकाच वर्गात पहिली, दुसरी, तिसरी, चवथी!!! मग मी तिसरी असताना चारही वर्गाचा अभ्यास करायचो. गुरुजीना ते माहिती होते. परिक्षा फक्त मी एका वर्गाची देत असे तोंडी उत्तरे सगळ्या वर्गांची.. गुरुजी विसरून जात कि हा कोणत्या वर्गाचा आहे. फक्त बसतो ती ओळ पाहून ते समजायचे. असो!!
तर सकाळी घरी विविधभारती चालू असे त्यामध्ये संगीत वाजेल तसे मला समजायचे किती वाजले ते.. सकाळी चित्रलोक हा कार्यक्रम नवीन हिंदी गाण्याचा मी मग जेवायला बसायचो. त्यावेळी "दिल तो पागल हैं" नवीन आला होता, आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.
डब्यात पातळ भाजीतील खालची भाजी आणि वर ज्वारीची भाकरी भरायची, भाजीतील सगळ पाणी काढून भरावी लागे नाहीतर दप्तरात भाजी सांडून पुस्तके खराब होत असतं. तसा सगळ्या दाप्तराना वास होताच!!!
पायात चप्पल कधीतरी असायची म्हणजे नव्हतीच. "आई मी जातो" हे वाक्य मी घरातून बाहेर पडताना अगदी पहिली पासून कॉलेज पर्यंत म्हणालो आहे. तर आम्ही निघालो शाळेला. तेव्हा INTERNET , MOBILE असले काही असेल, असते वैगरे ची काळजी नव्हती. काळजी हीच कि कधी शाळेत जातोय आणि गुरुजी कधी दिसतात म्हणजे प्रार्थना सुरु होण्याच्या आधी गुरुजीना मी दिसलो पाहिजे. कारण हुशार आणि ढ दोन्ही मुलांना जाधव गुरुजी धमक्क लाडू एकाच प्रकारे देत असतं, अगदी चड्डीत मुतला पाहिजे. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना झाली कि सगळे वर्गात यायचे किंवा आधीच आतच असायचे.
जेव्हा मी पाहिलीतून दुसरीला गेलो तेव्हाची गोष्ट असेल . मला १ ते १०० काढता येत होते आणि दुसरीच्या मुलांचे बघून मी पाढे पण पाठ केले होते. पण बाराखडी काय डोक्यात बसली नव्हती. आगावू होतो मी. पहिलीला एक बाई (MADAM) आणि एक गुरुजी (SIR) होते. तर अंक, पाढे गुरजींनी शिकवले होते, आणि मुलाक्षरे, बाराखडी बाई शिकवत होत्या. मुलाक्षरे मी नीट काढली होती, आता बाराखडी.. तिकडे दुसरीच्या वर्गात "क" ला काना "का", "ख" ला काना "खा" चालू होते.
मग मी पण इकडे चालू केले
अ ला काना आ , आ ला काना अआ, इ ला काना इअ ई ला काना ईंअ उ ला काना उअ ......
... असे. आता याचे उच्चार पण तसेच होते बरका. मी कोणाला दाखविले नाही ते.
मग बाईनी सांगितले अ पासून अं पर्यंत एकदाच लिहा आणि क पासून पुढे बाराखडी लिहा.
पाढे मात्र सगळे पाठ झाले होते अगदी २० पर्यंत. खरच दुसरीत असताना मला २० पर्यंत पाढे पाठ होते. (आता च्या पोरांना येत नाहीत म्हणून तर भरत जाधव सतरा साते किती? सगळ्यांना विचारत होता.)
जाधव गुरुजी नी गणित आणि पाढे खूप चांगले करून घेतले माझ्याकडून त्यामुळे मी दहावी आणि अगदी अजून accounts मध्ये पुढे आहे.
(आठवी ला असताना मोठ्या शाळेत मला पहिल्या सत्रात ७५ पैकी ७१ मार्क्स मिळाले आणि सर नी समोर बोलावून कोणत्या शाळेतून आला विचारले तेव्हा मला जाधव सरांची आठवण झाली होती).
हा तर आता बाराखडी आणि अंक गणित पाढे झाल आता गाडी जोरात चालू लागली.
आम्ही सहाच होतो (batch ला). तीन मुले आणि तीन मुली. (आता मी सोडून सगळ्यांची लग्न झालीत २०१०).
मी वरच्या वर्गातील मुलांची पुस्तके वाचत असे. पहिल्या दोन तीन दिवसात माझ्या वर्गाची पुस्तके वाचून झाली कि वरच्या वर्गाची पुस्तके घेत असे.
majha शाळेतील अवतार एकंदर असा असे. पायात चप्पल नाही, गुढगे कायम पांढरे, त्यातला एक फुटलेला. वरती अर्धी चड्डी, खिसे फाटलेले. (त्याच्या पोटा पेक्षा जास्त समान भरले की काय होणार) नावापुरता पांढरा राहिलेला शर्ट, म्हणजे कधीतरी तो घेतला होता तेव्हा पांढरा होता पण नंतर धुण्यासाठी कधीही साबण मिळाला navhata . हातावर पांढरे काळे ओघळ. डोक्याला मात्र थोडे का होईना खोबऱ्याचे मिळत तेल होते. दप्तर म्हणजे बाजाराची पिशवी. त्याचे बंद कधीही सहा दिवस टिकत नसत. पाणी payala शाळेत सोय होती नव्हती, असते का माहिती नव्हते. मग आम्ही कोणाच्याही घरी जाऊन पाणी मागत असू. बहुतेक मी शाळेत कधीच जेवलो नाही कोणाच्यातरी घरी जात असे. माझे आबा शाळेच्या गावाचे जावई होते मग मला पण तेवढा मान मिळत असे. पण आम्ही तसे कधी वागलो नाही.
पहिली दुसरी तिसरी चवथी सगळ्या मध्ये मिळून एकदा धावण्याची शर्यत होती. मी तिसरीत, उंचीला आणि वजनाला कमी होतो १८ किलो होतो. मझ्यपेक्षा दोन मुले मोठी होती, मी रोज जाताना पळत जातो होतो सराव करत होतो, पण energy नव्हती. २६ जानेवारीच्या निमित्ताने आयोजन केले होते. सरपंच आले होते. भाषण स्पर्धा पण होती. त्यात मी जमशेदजी टाटा चे भाषण पाठ केले होते. आधी धावण्याची शर्यत चालू झाली. आम्ही चार मुले होतो पळायला. एक चवथी चा मी आणि माझ्या वर्गातले दोन. एकूण चार
सगळ्यांच्या घरचे, बाजूचे आले होते. माझी एक मैत्रीण होती.. त्यावेळी पण अगदी जवळची. मला समजून घेणारी. कधीही रागवत नसे. नेहमी समजून सांगत असे ती मला. मग माझ्यासाठी आता तीच होती, घरचे कोणी नव्हते मी एकदा तिच्याकडे पाहिले आणि धावायला सुरुवात केली. माझ्या बाजूने धावणारा मोठ्या बापाचा होता चप्पल घालून धावत होता चवथी च्या पोराने तर बूट घातले होते. थोडे पुढे गेलो की तो चप्पल घालून पळणारा जोरात पडला. त्यःचा बाप माझ्या नावाने ओरडू लागला, यानेच पाय मध्ये घातला म्हणून तोपर्यंत बाकीच्या दोघांनी निम्मी शर्यत पूर्ण केली होती, मी थांबलो होतो त्याला उठविले मग पळत गेलो आणि चवथा म्हणजे शेवटचा नंबर आला माझा. नंतर भाषण दिले जोरात. तिथे ताकदीची गरज नव्हती. झाल सगळे बोलून झाले आणि सरपंच उभे राहिले पाहिले दुसरे तिसरे बक्षिस दिले मला मात्र फक्त काही रुपये बक्षिस म्हणून दिले. आठवतात तरी ते अजून खरच डोळ्यासमोर आहेत, पुढे मी ते कोणाला दिले काय केले ते नाही माहित.
तिसरी पास झालो. माझा पहिला नंबर असणारच. चार महिने झाले असतील आणि जाधव गुरुजी बदली होऊन निघून गेले. आता बाई न जमत नव्हते चार वर्ग मग आम्ही जिल्हा परिषद च्या सातवी पर्यंत च्या शाळेत गेलो. तिथे खूप मुले होते ६० मुले होती चवथी ला माझे तीन चुलत भाऊ भेटले मला तिथे. मोठी बहिण सातवीला त्याच शाळेत होती. आम्ही मधेच सहा मुले गेलो मग आमची वेगळी ओळ केली गेली. मी सर्वात पुढे. आता आणखी हुशार मुले होती मझ्यपेक्षा. मला थोडी मजा वाटली. मग आता माझा नंबर पहिल्या पाच मध्ये यायला लागला. पाचवी मध्ये मी एकदा तिसरा पण नंबर मिळविला होता सहावी ला पाचवा.. सातवी मध्ये फक्त ६३% मिळविले.

हा तर मी आता मोठ्या शाळेत जाऊ लागलो.. तिथे तालुक्याची शाळा होती. ५ बाई, २ गुरुजी, १ मुख्याध्यापक. आणि १ तालुकामास्तर
पिण्याच्या पाण्याचे हाल चालू झाले तिथे मला कोण ओळखत नव्हते. बहुतेक वर्गातील मुले जवळची होती मला मात्र दोन किलो मीटर चालत जावे लागे. पाचवीपर्यंत तिथे पण चांगला मित्रपरिवार जमविला. माझा मोठा भाऊ बहिण आधी त्याच शाळेत शिकायला होती. दादाच्या मित्राची बहिण आता माझ्या वर्गात होती. माझ्या शेजारी बसत होती. हुशार अशी नव्हती पण बाप कॉलेज ला काम करायचा म्हणून खूप आगाऊ होती. कोणाशी बोलत नसे. रोज शेजारी बसल्याने आवडू लागली होती. तिचे घर जवळ होते. मोठ्या बापाची असल्याने कपडे, दप्तर, पुस्तके पाटी सगळे कसे भारी आणि व्यवस्तीत होते. पण गणितात तिला काय जमत नसे. माझा बघून खूप वेळा गणित सोडवायची. पाचवीत असताना inspection साठी बाहेरून शिक्षक आले. त्यांनी आधी तिला उभे केले आणि मग मला विचारले "ती मुलगी आहे तिचे नाव XXX आहे" इंग्लिश मध्ये सांग. आणि मी तिचे नाव घायला लाजलो. वर्गात एकाच हशा पिकला. मग मी कसेतरी उत्तर दिले. नंतर शिक्षक निघून गेले. माझी ती पहिलीपासून ची जुनी मैत्रीण तिला मी आधीच सांगितले होते मला शेजारची मुलगी आवडते तिने आणि दोघी तिघी नी मला बाजूला घेऊन घेऊन हळूच विचारले "तुला ती आवडते ना" मी गप्प बसलो आणि त्यांनी सगळीकडे बोंब केली याला ती मुलगी आवडते. आता वर्गात खूप धिंगाणा चालू झाला होता. "याला ती आवडते म्हणून त्याने तिचे नाव नाही घेतले" आता वर्गातली मुले माझ्या कडे येऊन म्हणू लागली "अरे बोल की तुला ती आवडते ना" ती तिकडे खाली दप्तरात तोंड लपवून बसली होती आणि मी इकडे!! तिच्याकडे पहायची हिम्मत पण होत नव्हती माझी. ती दुपारच्या सुट्टीत घरी गेली. मी घाबरलो होतो. माझ्या मैत्रिणीला सांगितले तिला समजून सांग म्हणालो. मी काहीच म्हणलो नाहीये मुलांनी मुद्दम उठविले आहे काहीतरी... मग माझी मैत्रीण तिच्या घरी गेली समजून सांगितले आणि तिला घेऊन शाळेत आली. बाई आल्या नव्हत्या अजून वर्गात. चार वाजता बाई आल्या आणि मग वातावरण बदलले. पण मला वेगळेच वाटू लागले. खरच मला आवडत असेल तर काय हरकत आहे तिला बोलायला. मी हुशार होतो वर्गात. शाळेत सगळ्यांना माहिती होते ते. त्याला कारण तसे होते

चवथी आणि सातवी ला scholorship ची परिक्षा होती. पास आणि नंबर आला तर शाळेचा पुढचा सगळ खर्च मिळणार होता. मग काय चवथी मध्ये मी बसलो ना scholorship ला. माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी scholorship च्या अभ्यासाठी एकच मोठे पुस्तक मिळायचे पंधरा रुपयाला होते ते. पण जुनी मिळत फुकट मध्ये. पण फाटलेली. मला पण एक मिळाले. त्याला सुरुवातीची काही पाने नव्हती. मी वाचून काढले मला आगावू पणाची सवय होती. आणि त्यात सगळं वेगळेच होत, गणिते तर सोडवायला तर मजा येत होती. चार पाच दिवस ते पुस्तक होते माझ्याकडे. मी पेन्सिल ने योग्य पर्यायावर खुणा करत होतो. मला माहिती नव्हते की पुस्तकाच्या शेवटी उत्तरे आहेत ते. मग एकदा मोठ्या भावाने सांगितले की अरे शेवटी उत्तरे आहेत बघ तुला काय जमतेय का नसेल तर बघून मग पाठ कर. आणि मग मला खूप मोठा शोध लागला. अशीच गम्मत म्हणून सोडविलेली सगळी गणिते आणि उत्तरे बरोबर आली होती. शाळेत बाईना दाखविणार होतो पण पुस्तक खूप फाटलेले होते मग नाही दाखविले. आता इतके सगळे झाले होते, एकदा बाईनी ते पुस्तक पाहिले माझ्या हातात. आणि म्हणाल्या " अरे तू का याचा अभ्यास करतो, चवथी चे पुस्तक वाच त्यामध्ये असलेली गणिते सोडव" मला काही समजले नाही. मला फक्त माहित होते की मी scholorship चा अभ्यास करतोय .
मी परत विचारले काय करू आणि काय झाल म्हणून
तेव्हा बाईनी नीट समजावून सांगितले आणि दाखविले
"अरे बाळ तू जे पुस्तक घेतलेस आणि अभ्यास केला गणिते सोडविली ती सगळी बरोबर आहेत पण तू चवथी च्या scholorship ला बसला आहे सातवीच्या नाही आणि हे पुस्तक सातवी चे आहे"
आता मला कळेना काय करायचे ते.
शहरात गेलो परिक्षा दिली घरून खायला दीड रुपया घेऊन गेलो होतो सकाळी चालत गेलो तालुक्याच्या मोठ्या मोठ्या हाय स्कुल मध्ये जिथे तीन चार हजर मुले होती शिकायला. (खट्टा - मिठा मध्ये दाखविलेले मुनिसीपल ऑफिस तेच ते)

परिक्षा चालू झाली खूप मुले होती माझ्या बरोबर. गम्मत म्हणजे मी पहिल्यांदा बेंच वर बसलो होतो. चार पर्याय मधून १ उत्तर म्हणून लिहियाचा होता. तिथे गेल्यावर समजले सगळे प्रश्न सोडवून होत नाहीत. मग शेवटी ५ मिनिट मध्ये अंदाजे कोणता पण पर्याय लिहून टाकायचा. (चायला मग आधीचे तरी का विचार करून सोडायचे? सगळे अंदाजे लिहू की)

झाली एकदाची ती परिक्षा संपली. पुढे खूप दिवसांनी तालुका मास्तर निकाल घेऊन आले.
सातही वर्गाना बाहेर उभे केले जसे सकाळी प्रार्थनेला उभे करत तसे.
"चवथी आणि सातवी च्या आणि त्या आधीच्या मुलांमध्ये एकच मुलगा पास झाला आहे"

आणि तो....
मी होतो.

मला वर वरांड्यात बोलावून निकाल पत्रक दिले, इंग्लिश मध्ये होते कळायला थोडा वेळ लागला.
पुढे मी ते विसरून गेलो.. आता कुठे असेल ते असेल बहुतेक कुठेतरी.
बर तर पाचवी पास झालो म्हणजे ७४% होते. सहावी ला जरा अवघड वाटू लागले काय झाल समजल नाही. थोडे मोठे झालो होतो शिंगे फुटली होती, मित्र वाईट भेटले होते, का मी हुशार म्हणून मुद्दाम बाकीच्या हुशार मुलांनी माझ्या सोबतीला वाईट मित्र लावले होते काही समाजात नव्हते. एकंदर माझा थोडे लक्ष नव्हते शाळेत.
घरी जाताना वाटेमध्ये म्हशीचा गोठा होता . तिथे आम्ही उस खायला जायचो. कधीतरी मिळायचा. मग घरी जाताना वाटेमध्ये आणखी उसाचा फड म्हणजे उसाची खूप मोठी शेती होती, मला माहिती होते ती कोणाची आहे, माझे मामा लागत होते, पण तो खडूस आहे हे पण माहिती होते, मी आधीच्या शाळेत असताना त्याचा मुलगा माझ्या वरच्या वर्गात होता. धावण्याच्या शर्यती मध्ये तो पहिला आला होता तोच तो. त्याच्या कडे ट्रक्टर होता. पाच सहा ठिकाणी खूप शेती होती. आणि विशेष मध्ये घरी बजाज M80 पण होती. तर मी आणि माझ्या त्यावेळचा वाईट मित्र दोघे त्या उसात शिरलो. जमेल तो उस मोडला. आणि रस्त्याला लागलो. आणि समोरून उसाचा मालक त्याच्या ट्रक्टर वरून आला.
तो: "उस कोठून आणला"
मी: "मामा तुमच्या शेतातून आणला" (खरे बोललो तर सोडेल म्हणून)
मग त्याने माझे आणि मित्राचे दप्तर काढून घेतले त्याने तर रस्त्यावर भोंगा पसरला मी रडत रडत त्याला म्हणत होतो मामा परत नाही मोडणार उस दप्तर द्या आता इथे मारा पण दप्तर द्या... त्यावेळी मला दप्तराची काळजी होती, अभ्यासाची काळजी होती. आणि त्याच्या मनात वेगळेच होते..
दप्तर घेऊन जाताना तो उसाचा मालक इतकेच म्हणाला
"आई बापाला पाठव दप्तर घ्यायला"
तो मित्र आणि मी आणखी जोरात रडायला लागलो.. कारण आता घरी सगळ सांगावे लागणार..
"उसात का शिरला, सरळ घरी येता येत नाही का... आणि तुला त्याचाच बरा उस सापडला" हे सगळे मार खाऊन ऐकावे लागणार होते.. डोळ्यासमोर सगळ दिसू लागले..
माझ्यासाठी एक चांगलं होते ते म्हणजे मी उस मालकाच्या मुलाचा मित्र होतो.. आणि घरात लहान होतो.. मारतील पण जास्त नाही..

मला तेव्हा दप्तराची खरी किंमत कलली होती, रोज आपण घरी आणून टाकतो आज ते आप्ळूं बरोबर नाही.. त्यात किती किमती पुस्तके असतात आपण लिहिलेले सगळे असते. जे आपण मनापासून लिहितो पाठ करतो तेच कोणी काढून घेतले होते .कसेतरी झाले..त्याचा भास होत होता. शेवटी परत माघारी निघालो त्याच्या घराकडे वाटेत त्यांचा शेजारील एक ओळखीचे भेटले त्यांनी आधी पाणी दिले आणि खायला भुई मुगाच्या शेंगा दिल्या ओल्या शेंगा मस्त होत्या पण आता घशात काहीच जात नव्हते.
वाटले मघाशी जाताना शेंगा दिल्या असत्या तर मी कशाला उस मोडला असता.
नंतर "उस मोडला" हे प्रकरण खूप पुढे गेले होते. मी इतका धसका घेतला होता की माझ्या घरचा उस पण मी मोडत नसे.
मग तसेच घरी आलो मित्राच्या बहिणीने आधीच घरी सगळे सांगितले होते. स्वागताला आई तयार होतीच.. आई ने आमचे चांगलेच स्वागत केले आणि बाहेर निघून गेली. मी हळूच बाहेर जाऊन पाहिले कुठे जातेय ते बहुतेक ती दप्तर आणायला गेली असावी. खूप उशिरा हळू हळू येताना दिसली. जवळ जवळ तीन किलो मीटर होते त्या उसाच्या मालकाचे घर. आई तासाभरात जाऊन आली होती. पण तिच्या हात काही नव्हते. मग दप्तर कुठे आहे? दिले की नाही आई गेली होती का? अजून आबा आले नव्हते गातून तोवर दप्तर आले पाहिजे घरी.. मला परत भीती वाटू लागली... रात्री आबा आले परत भरपूर एकूण घेतले..
आणि उद्या ते शाळेत येणार होते बाई ना सांगायला मी कसा आणि कोणाचा उस चोरला ते.....
दुसऱ्या दिवशी मला सकाळी दप्तर मिळाले का तर शाळेचा अभ्यास करायचा असेल म्हणून पण मी त्या दिवशी शाळेत गेलोच नाही. तिसऱ्या दिवशी गेलो थोड्या वेळा आबा आले.. आणि बाई ना सगळे सांगितले सगळे पोट धरून हसत होते नंतर माझ्याकडे बघू लागले.. नंतर मला कोणीतरी सांगितले ती मला आवडणारी मुलगी सगळ्यात जास्त फिदी फिदी हसत होती. पण माझा विश्वास होता ती नसेल हसली मुलांनी मुद्दाम तसे सांगितले असेल मला....
काहीही असेल तेव्हा पासून मी घरी अभ्यास बंद केला. जेवढे शाळेत शिकवतात त्यावर परिक्षा देऊ लागलो.. दप्तर घरी आणले तर माझ लक्ष नसायचे.. माझा अभ्यास कमी झाला.. एकंदर तेव्हापासून शाळेतील लक्ष दूर झाले होते..
मनामध्ये कुठेतरी वाटून गेले की माझी इतकी मोठी चूक नव्हती... एकदाच उस मोडला होता खरे बोललो होतो त्याने सांगितले असत की पुन्हा मोडू नको तरी चालले असते.
बाकी नंतर सांगेल कधीतरी ...



















* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
This message is provided for informational purposes and should not be construed as a solicitation. You are hereby notified that any dissemination, distribution, or copying of this communication or use of the information contained herein upload, post, email, transmit or otherwise make available any Content that is unlawful, harmful, threatening, abusive, harassing, tortious, defamatory, vulgar, obscene, libelous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable is strictly prohibited.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

Friday, August 6, 2010

ऑफिस ला मिळालेली नवीन pant !!!

ऑफिस ला मिळालेली नवीन pant !!!

अशी घळघळीत आहे कि काय सांगू, अगदी मोकळ मोकळ वाटत... baggi का काय ते म्हणतात ना तशी शिकून दिली आहे.
मागच्या वेळची एक PANT घरी राहिली असल्याने मी पहिल्या दिवसी ती नवीन baggi pant घालूनच गेलो, बाहेर पडताना सोबती खूप हसला. आणि म्हणाला छान दिसतेय. (?). नेहमी सारखं ऑफिस ला आलो कोणी काही बोलत नव्हते. पण मला पाहताच चेहरा वेगळा होत होता. दुपारी आणखी एक साहेब नवी pant घालून आले होते त्यांना मात्र ऑफिस च्या इतर लोकांनी वेडे केले होते. वैतागले होते ते. शेवटी ठरवून टाकले pant परत देऊन चांगल्या घेऊ. माझी तर इतकी मोठी शिवली होती कि मी आणि माझ्यासारखा आणखी एक माणूस त्यात बसून जागा शिल्लक राहिली असती. जेवणानंतर सगळे बसले होते स्वागतकक्षात. मला बोलावले म्हणाले
"कोणाची आहे इतकी मोठी pant ".
मी अभिमानाने सांगितले "आपल्या ऑफिस ने दिली आहे मग घातलीच पाहिजे".
तर ते म्हणाले "अरे मला वाटल आजारी होता म्हणून असा दिसतोय तू?"
गुरुवार होता ठरविले उद्या JEANS आणि नवीन शर्ट घालून येणार. शुक्रवारी साधा पोशाख चालतो ऑफिस चा नाही घातला तरी चालतो
मग नुकताच धुवून आणलेला शर्ट आणि पांढरी JEANS शोधून काढली ती पण मित्राच्या कपड्यामध्ये सापडली कारण तो कपडे धोब्याला देताना मीच त्याच्यात हे ठेवले होते. धोब्याने चांगली धुलाई केली होती मस्त इस्त्री पण केली होती. मनात थोडा विचार आला हे धोबी जास्त पावडर टाकतो कपडे खराब झाले असतील लवकर उसवून फाटतात . मग मस्त स्प्रे मारून निघालो (WILD STONE ) "जंगली दगड" मारताना एक जोरात शिंक आली... पण वास छान येत होता. दुपारचे तीन वाजून गेले होते शर्ट आणि पांढरी pant खराब होऊ नये म्हणून रिक्षा ने जायचे ठरविले. तशी एकपण पोरगी दिसली नव्हती अजून, त्यामुळे माझ्याकडे कोणी पाहिले नव्हते. (याच्या आधी एकदा हाच पोशाख करून फोटो काढले होते आणि ओर्कुट वर टाकले होते एका मुलीने comment केली होती "विदुषक") एक रिक्षा आली त्यात तिघे आधीच बसलेले होते. मग जागा करून मागे बसलो. थोडा आवाज आला कसला तरी. पुढे एक मोठी गुजराथी (काकू) बाई होती तिला बसविण्यासाठी मला पुढच्या बाजूला बसावे लागले (मागे चार पुढे दोन) मला परत आवाज आला बसताना थोड समजल आवाज मागून येतोय इतकेच. आता रिक्षा मध्ये मी आणि चालक पुढच्या सीट वर होतो त्यामुळे मला एका हाताने पकडून बसावे लागले पाठीला आणि PANT ला थोडा ताण आला होता . एका थांब्यावर ते आधीचे तीन प्रवासी उतरले मी पैसे काढून ठेवण्यासाठी मागे हात केला तेव्हा समजले मघाशी दोन वेळा जो आवाज झाला तेव्हा माझी ती धोब्याने धुतलेली JEANS वितभर फाटलेली आहे आणि आपण इन-शर्ट केलेला आहे. गपचीप आताच मोकळ्या झालेल्या मागच्या सीट वर बसलो, शर्ट मोकळा सोडून फाटलेली pant झाकली. रिक्षाचालक आणि ती मोठी बाई होते पण त्यांना काही समजले नाही. आता ऑफिस ची वेळ झाली होती परत जाऊन बदलून पण येता नव्हते. मस्त निघालो होतो मनात वाटले तीच ऑफिस ची pant बरी आहे मोठी ढगळी असली तरी असी फाटणार तरी नाही. आता विचार करून उपयोग नव्हता. मी ऑफिस च्या आत आलो होतो आधी बाथरूम मधील मोठ्या आरश्यात पाहून घेतले कि किती आणि कशी फाटली आहे ते. आणि दिसत तर नाही ना. माझे मलाच हसू येत होते.. भेटणारा प्रत्येक जन म्हणत शर्ट आणि JEANS पाहून होता "आज काय एकदम टकाटक!!" आणि सुगंध पण सुटला होता
(WILD STONE चा). जागेवर बसलो तर आणखी आवाज आला "टर टरर्र टर्रर्र्र्र र्र र्र र्र र्र र्र !!" आणखी फाटली कि काय? "टर टरर्र टर्रर्र्र्र र्र र्र र्र र्र र्र !!" ऑफिस ची दैनंदिन कामे चालू केली आणि विसरून गेलो. चहा झाला. जरा फिरून यावे असे वाटले. मग बरोबर काम करणाऱ्या मित्राला घेऊन गेलो. तो म्हणाला "अरे ऑफिस ला आहेस इन-शर्ट कर"
मी " आज असेच ठीक आहे"

आईशपथ!! किती मस्त निघालो होतो मिरवायला पण काय सगळा घोळ केला होता त्या धोब्याने आणि त्याच्या पावडरने. पण एक ठीक झाले काही दिवसानंतर मित्राचे लग्न होते तेव्हा मी घालायला हा ड्रेस ठेवला होता त्याची आजच वाट लागली म्हणून ठीक नाहीतर लग्नात असा घोळ झाला असता. "जो होता हैं ओ अच्छे के लिये होता हैं"


एक आठवण झाली. तेव्हा मराठी शाळेत अर्धी खाकी चड्डी, पांढरा शर्ट गांधी टोपी घालायला लागायची. सातवी ला असताना शाळेत घाईघाई ने गेलो, तिथे गेल्यावर मित्राने सांगितले चड्डी मागून फाटली आहे. मी नीट पाहिले तर घरी घालायची चड्डी आणि शाळेचा शर्ट घालून मी आलो होतो. म्हणजे शाळेची चांगली चड्डी घालायची विसरलो होतो. साडे दहा वाजले होते अर्धा तास बाकी होता अजून कोणी जास्त शाळेत आले नव्हते, घर २ किलो मीटर लांब होते, पळत घरी गेलो आणि ती बदलून आलो.


-
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
This message is provided for informational purposes and should not be construed as a solicitation. You are hereby notified that any dissemination, distribution, or copying of this communication or use of the information contained herein upload, post, email, transmit or otherwise make available any Content that is unlawful, harmful, threatening, abusive, harassing, tortious, defamatory, vulgar, obscene, libelous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable is strictly prohibited.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

एक दिवस अचानक रात्रपाळी ला ऑफिस ला काम करावे लागते आणि आजारी पडून काय हाल होतात.

जोपर्यंत सरळ आणि साध जीवन चालू आहे तोपर्यंत छान वाटे....
आपल्या भोवती एक वर्तुळ तयार करून त्यात स्वताला सुरक्षित समजायला लागतो. आणि मग काही बदल करायचा
असेल आणि या वर्तुळाच्या बाहेर जायचे असेल तर सहजासहजी जात नाही. घरामध्ये प्रत्येक जन एक छाप निर्माण करतो,
त्यामुळे प्रसिद्धी, सातत्य मिळते, ऑफिस मध्ये स्वताचा ठसा उमटविला जातो. समाजामध्ये प्रतिष्टा निर्माण केली जाते.
यावरून सांगायचे असे की मानवी स्वभाव हा सवयी नुसार वागणारा आहे. तो नेहमी स्वताभोवती एक वर्तुळ तयार करतो.

आपला विकास करायचा असेल तर या वर्तुळाबाहेर जावेच लागते. हा बदल स्वीकारण्याची तयारी करणे खूप कठीण आहे.
नैसर्गिक आहे असे म्हणायला काही हरकत नसावी.

घरी आहे तोपर्यंत ठीक आहे, बाहेर एकटे राहत असताना कोणी विचरत नाही काय झालाय आणि काय केले पाहिजे ते. फुकटचा सल्ला देतील, पण सहन करणाऱ्याला समजते काय होत आहे ते.

एक दिवस अचानक रात्रपाळी ला ऑफिस ला काम करावे लागते आणि आजारी पडून काय हाल होतात.

ऑफिस ला एकदम सांगितले जाते तुम्ही आजपासून रात्रपाळीला यावे. मग रात्री १२.३० वाजता बाहेर पडावे आणि सकाळी ७.३० ला घरी जावे. असा अचानक दिनक्रम चालू होतो. मनाची तयारी होत असते. जेवण आणि झोप यांचे नियोजन होते. सगळे आपल्या मनाचे बेत असतात. सकाळी आपण झोपू आलो की मग संध्याकाळी पण लवकर झोपू असे काहीतरी मनात चालू असते. आणि मग ऑफिस ला झोप येणार नाही काम नीट होईल, चुका होणार नाहीत असे खूप नियोजन होते. एकतर कधी वाटलेले पण नसते की अशी वेळ येईल. ज्यांनी हे रात्रीचे काम दिले त्यांना दोष देऊन झालेला असतो. मानसिक तयारी होते. आणि आता वेळ असते सामोरे जाण्याची. रात्री जेवण करून मस्त बिछाना टाकला जातो. काय छान साखर झोप आली असेल. पण तेवढ्यात गजर वाजतो. आणि कसाबसा तो बंद करून परत झोप.... तो बिचारा परत वाजतो ०९ मिनिटांनी मग उठून किती वाजले आणि हा गजर आता का वाजला याचा विचार चालू होतो. डोक्यात प्रकाश पडतो अरे आज रात्री ऑफिस!!!!!!.. मग कपडे इस्त्री, आवरून बाहेर पडायला १२.०० तरी होतात. कधी काळी नवीन वर्षाचे स्वागत कार्यका रात्री १२.०० ला बाहेर पडणारे आज ऑफिस साठी बाहेर पडलेले असतात. पण विचार करायला वेळ नसतो आणि साखर झोप गेलेली नसते. आणि पुढचा प्रवास, गाडी येणार आहे पण तिची वेळ नक्की माहिती नाही. चालकाचा क्रमांक नाही. मग ऑफिस ला कोणाला तरी विचरून कसेतरी गाडी बद्दल नक्की काय ते समजते. "गाडी १२.३० ला येते"
बाहेर पाऊस पडत होता.
गाडी आली त्यामध्ये चालक झोपेतच असतो. त्याला पण अचानक रात्री बोलावलेले असते नेहमी शुभप्रभात करणारा आता काय बोलावे !! झाल एकदाचा गाडीमध्ये बसलो..का झोपलो कळत नाही.. गाडी ऑफिस ला येते चालक सांगतो तेवा समजते. आधीचे सहकारी काम सांगून (अंगावर टाकून) घरी जातात. आता वेळ असते प्रत्यक्षात काम करण्याची. संगणक वेळ दाखवीत असतो १२.५० AM थोडे विचित्र वाटते मग तिकडे बघणे सोडून समोरचे काम करायला सुरुवात होते. थोडे काम केले नाहीतरी कोणीतरी सांगते जेवण का नाश्ता आला.. नेहमीची सवय १२.०० ते ०१.०० ला जेवण करायचे आज ०४ वाजता कसे काय? थोडा वेळ लागतो समजायला कारण डोळ्यावर झोप आलेली असते.. आणि ती सावरताना खूप हाल होत असतात. हा तर मग आता जेवण असेल की नाश्ता? आणि तो पण रात्री? रात्री चार वाजता? ......
आपल्या बापजन्मात कोणी इतका उशिरा जेवण /नाश्ता केला नसेल. चला थोडा वेळ विश्रांती मिळेल आणि बघू तर काय आहे ते? नेहमी पेक्षा हळू पावलाने कॅन्टीन ला पोहोचत असताना समजते की आज फक्त नाश्ता आहे कांदेपोहे आणि चहा. ...
मला आठवते कॉलेज ला असताना सहल गेली होती, तेव्हा एकदा प्रयत्न झाला होता असे रात्री पोहे खाण्याचा. पण तेवा तर पहाटेचे ५.३० होऊन गेले होते. पण नंतर किती त्रास झाला होता. ते पोटात दुखणे एक उलटी आणि सगळ्या सहलीची वाट लागली होती. का तर सकाळी लवकर कांदे-पोहे खाल्ले होते. आज पण ती आठवण ताजी झाली होती.
..हा तर आता कॅन्टीन ला कांदे पोहे आणि चहा होता रात्री ४.०० वाजता. रांगेत उभे राहून पोहे घेतले, पुढे चहाची किटली पाहून जीवात जीव आला..आणि टेबल वर बसलो. पहिला घास घेतला चव लागत नवती.. असे कसे रात्री/पाहते जेवण केले तर चव लागत नाही का? मग कोणीतरी शोध लावला मीठ कमी आहे, पोहे चांगले नाहीत असे तसे. मीठ टाकले आणि कसेतरी ते संपवले.. पोटामध्ये काहीतरी गेले थोडे बरे वाटले आणि तो (अमृतासारखा) चहा घेतला. आणखी एक कप हातामध्ये घेऊन ऑफिस ला जागेवर परत आलो. बरेच काम बाकी होते. आता फक्त २-३ तास बाकी होते (रात्री वेळ कमी असतो ७ तासच असते रात्रपाळी).
काहीतरी विचित्र वाटत होते पोटामध्ये. जेवण खूप झाले होते की मघाशी खाल्लेले पोहे आपला प्रताप दाखवीत होते काही कळायला तयार नव्हते. बाथरूम मध्ये पाणी संपले होते.
परत जागेवर आलो तेव्हा वरून आणि खिडकीतून पांढरा प्रकाश येऊ लागला होता, सकाळचे ६.०० वाजले होते. आता घाई करायला पाहिजे होती. काम संपवून (दुसऱ्यावर ढकलून) रिपोर्ट केला, आणि स्वताचा अवतार एकदा आरशात पाहून घेतला. सकाळच्या पहिला शिफ्ट चे लोक आले होते. माझ्या कडील कोणी नव्हते आले. सगळे कसे विचित्र वाटत होते. झोप पण आली होती आणि सकाळ पण झाली होती. पहिल्या गाडी मध्ये बसून घर गाठले आणि खूप वैताग आला होता तरी सकाळची कामे आटपून आंघोळ करून रात्रीच घालून ठेवलेल्या बिछान्यावर पडलो. पडलो की झोपलो. किती छान झोप लागली होती. गणपती मध्ये कधीतरी रात्री १२-१ पर्यंत नाचून घरी आलो की कशी झोप लागते तशी झोप लागली होती (असे मला मित्राने दुपारी फोन जरून सांगितले होते. त्याआधी मी त्याचे फोन उचलले नव्हते ना). दुपारी उठलो जरा बरे वाटले. किती वाजले मी कुठे आहे काही समजायला मार्ग नव्हता. भूक लागली नव्हती, कपाळावर घाम आला होता. (सकाळी पंख बंद करून गेले होते मित्र). मग तो चालू केला तर खूप थंडी वाजू लागली.
नीट पाहिले तर नाकातून तोंडातून गरम हवा येत होती ..
FLUE .. मला चक्क ताप चढला होता ...
आता हा साधा तो नव्हता हे समजायला वेळ नाही लागला मला. भूक लागली नव्हती. तोंड कडू झाले होते. घसा वाजत होता.
घरी कोणीच नव्हते सांगणार कोणाला? आपले आपणच सहन करायचे?
पाणी उकळाविले थंड होऊ दिले आणि थोडासा ब्रश करून पाणी पिण्याचा प्रयत्न केला . बरे वाटले. घराची आठवण येत होती घरी फोन केला त्यांना समजू नये म्हणून आवाज नीट करून बोलत होतो आईने ओळखले तरी.
Tablet असतील, नाहीतर डॉक्टर कडे जायला सांगितले. खिशात मागचा कागद सापडला त्यामधील ३ tablets आणल्या आणि घेऊन झोपून गेलो. आता फक्त झोप आणि झोप. संध्याकाळी मित्र परत आले अवतार बघून समजले. लगेच जेवण आणून खायला घातले. ९ वाजता झोपलो पण परत रात्री १२.०० उठून ऑफिस ला गेलो. तिथे आधीच्या सहकारी मित्राने पाहिले खूप आजारी आहे मी ते. पण जरा बरे वाटत असल्याने आलोय असे सांगून त्याला जायला सांगितले.
आज जरा काम कमी होते असे वाटेल. काम संपून परत तो नाश्ता आला आज फक्त चहा घेतला. आणि काम संपवून घरी गेलो. tablet मुळे ताप उतरला होता थकवा होता थोडासा. अजून ४ दिवस रात्रपाळी बाकी होती, विचारू करून परत ताप येणार असे वाटले. पण आता मनाची आणि शरीराची पण तयारी झाली होती.
गुरुवारी ११ वाजता उठलो. खूप ताप चढला होता दादा ला फोम केला आणि सांगितले मी घरी जातोय. रक्त चेक करून बघतो. आणि मग दुपारी १२.३० ला निघालो. taxi ने वापी. वापिवरून मुंबई दादर मार्गे पुण्याचे तिकीट काढले. बाकीचे मोजून पाहिले फक्त चाळीस रुपये बाकी होते. दादर ला ATM मधून काढू असा विचार केला. कारच्या खिशात ATM कार्ड नव्हते. मी ते दमन ला विसरलो होतो आता वाटे मध्ये पाणी आणि नाश्ता इतकेच पैसे शिल्लक होते पुण्यावरून घरी जायला शंभर रुपये तरी पाहिजे होते. अंदाजे रात्री आठ वाजता मी पुण्यात पोहोचणार होतो. पुण्यात मित्राला बोलावले तो पावसात भिजत गाडीवर आला होता. दोनशे रुपये मिळाले आणि घरी गेलो . सकाळी परत दुसऱ्या मित्राकडून १ हजार रुपये घेतले आणि BLOOD & URINE टेस्ट करायला गेलो तिथे त्या पोरीने आधी २५० रुपये घेतले. शुक्रवारी दुपारी रिपोर्ट घेऊन मी डॉक्टर च्या समोर बसलो.
" काही झालेले नाही urine मध्ये थोडा प्रोब्लेम आहे" बाकी सगळं नॉर्मल आहे.
मी पण रिपोर्ट पाहिले मला पण रिपोर्ट थोडेसे कळू लागले होते मागच्या वेळा सात वेळा रिपोर्ट काढला होता, वाचला होता.
तरी मी डॉक्टर ला परत विचारले "WBC (पांढऱ्या पेशी) पण नॉर्मल आहेत का? आणि HB ?
डॉक्टर: हो आहेत बरोबर. मी फक्त TABLETS देतो, त्या घे ताप थोडा आहे नॉर्मल आहे तो काही काळजी करू नका. रविवारी दादा आला होता. शनिवारी आणि रविवारी विश्रांती घेऊन सोमवारी परत दमन ला पोचलो. जाताना दादा होता बरोबर. मुंबई पर्यंत मस्त travels मध्ये झोपून गेलो.
सोमवारी दुपारी ३.३० ला ऑफिस ला गेलो.

सगळे लिहियाचे कारण हेच की अचानक झालेला बदल मी मानसिक तयारीने स्वीकारला होता पण शरीराने नाही..

असो झाली एकदाची रात्रपाळी आणि परत मी दिवसा ऑफिस ला रुजू झालो. आठवण मात्र आहे..

तुमची आठवण सांगा...

एकाच सीट वर बसलो विकास : काय केल घरी प्रियाका : ** एक्स्पिरे झाली होती विकास : ????!!! प्रियांका : खूप रडले होते ...