माळावरचे दोन पाकी कौलारू घर. समोर मोठा लालभडक शंकेश्वर
(गुलमोहोर) बाजूला कायम हिरवे असणारे करंजे चे झाड, त्यावरील फुले
आणि त्यावर गोंगाट करत फिरणाऱ्या मधमाश्या, आणि त्याच्या बाजूला आणि मागे
उंच शेराच्या झाडाचा ताटवा.
एका वर्षी एप्रिल मे महिन्या मध्ये खूप पाऊस चालू झाला. अगदी ओळ
दुष्काळच. शेतामध्ये जाता येत नव्हते. मशागतीविना शेतामध्ये कंबरे
इतके गवत माजले. आधीची पिके तशीच उभी असल्याने आणखी गवत वाढले होते.
माळावर, तालीमध्ये खूप पाणी जिरले मग खालच्या शेतामध्ये ते मनी पाझरू लागले
होते. विहिरीमध्ये तर पाणी भरून बाहेर वाहत होते. बाजूचे आंब्याचे झाड,
कान्हेरी, घाणेरी, निर्गुडी, बोरीची झाडे हिरवीगार होऊन डोलत होती. माळावर
सगळीकडे निळी आणि लालसर, गर्द निळी फुले पसरली. त्यावर फिरणारी नाना
तर्हेची आणि रंगाची फुलपाखरे पकडायला मजा यायची. त्यावेळी मी दहावी पास
झालो होतो. तरीपण आम्ही शेळ्या मागे जात होतो. अजून अकरावीचे कॉलेज चालू
झाला नव्हते. तोपर्यंत शेल्यामागे फिरणे चालू केले, नाहीतरी आम्ही बाकी
काही काम करत नसू. तालुक्यापासून दोन किलोमीटर वर घर आणि शेत होत. नवीन
सायकल घेऊन दिली होती. दहावी मध्ये चांगल्या मार्काने पास झालो असल्याने
जरा बरे वाटत होते. घरच्यांनी पहिल्यांदाच पेढे वाटले होते. कॉलेज साठी
नवीन शर्ट pant घेतली. पण अजून वेळ होता, इकडे शेतामध्ये आणि रानात मजा
असताना कोणाला आठवण असणार कॉलेज ची. आणि अकरावीला म्हणे सगळेच पास असतात.
हा तर मी सांगत होतो आम्ही शेळ्या मागे त्या माळरानात आणि बागायती
शेतामध्य काळ्या चिखलात फिरत होतो. सकाळी उन पडले की शेळ्या सोडून
dayachya त्या बागायती मध्ये थोड्याफार असलेल्या पिकामध्ये पोहोचेपर्यंत
आमचे आवरून होत असे.
मग फुलपाखरे पकडणे, त्यांचे रंग हाताला चिकटून बसत. मोठी काळी
फुलपाखरे सापडत नसत. लहान लहान चंदेरी, सोनेरी
फुलपाखरे झुपक्याने बसलेली खूप छान दिसत. ती का तसी बसतात माहिती नव्हते.
माळावर चालताना जरा जपून चालावे लागत असेल. आमच्या पायात चप्पल कधी
नव्हतीच. पण माहिती असे बाभळीचे काटे कुठे असतील, आणि काचा, खडे कुठे
रुतणार. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही नीट चालत असू. बाकी मग सगळी कडे मीटर
दोन मीटर च्या उद्या मारत चालणार आम्ही. माळा आठवते असा एकपण दिवस गेला
नसेल की पायात कट रुतला नाही आणि जखम होऊन रक्त गेले नाही, रोजेच होते ते.
त्यात आमच्या शेळ्या काही खूप आगावू होत्या. त्यांची नावे पण .. काळी,
चिमणी, म्हातारी, माधुरी, बुटक्या कानाची.. मग तिचे करडू, तिच्या
नावाने ओळखले जायचे. सगळ्या मिळून दहा ते बारा होत्या. बोकड असेल तर ते
जास्त tras देत नसे. त्याला खायला जास्त लागत असल्याने ते मिळेल ते खात
असे. पण माजलेल्या शेळ्या खूप नखरे करत असत.
माळावरचे दोन पाकी कौलारू घर. समोर मोठा लालभडक शंकेश्वर (गुलमोहोर)
बाजूला कायम हिरवे असणारे कारंजे चे झाड, त्यावरील फुले आणि त्यावर गोंगाट
करत फिरणाऱ्या मधमाश्या, आणि त्याच्या बाजूला आणि मागे उंच शेराच्या
झाडाचा ताटवा
माळाचे वर्णन असे करता येईल .. माळावर सगळीकडे निळी आणि लालसर, गर्द
निळी फुले पसरली. त्यावर फिरणारी नाना तर्हेची आणि रंगाची फुलपाखरे . लहान
लहान चंदेरी, सोनेरी फुलपाखरे झुपक्याने बसलेली, मोठी काळी थोडीसी
पांढरी फुलपाखरे, त्यांच्या मध्ये काही खूप मोठी पण असतं, ती खूप वरून उडत.
मधेच एखादे बारीक निळे फुलपाखरे असे. ते वराने पण खाली पडून जीव सोडत
असे, खूपच लहान नाजूक असयाचे ते. तालीवर आणि शेजारी हिरवेगार गवत छान
दिसायचे. मऊ-मऊ गवत आणि त्यात असलेले दव, त्या
दवामध्ये सूर्याची किरणे शिरली की सात सांग दिसायचे. मालावरचे दगड तांबूस,
खर्पे असत. पण तिथे जपून चालावे लागे. विषारी विंचू आणि गोमी असत. तो
विंचू कधी चावला ते पण कळत नसे. त्याला चावायला सेकंदाचा पाचवा भाग पण लागत
नसे. माळावर उजव्या बाजूला तालीवरून गेले की दोन-तीन मीटर उंच टेकडी
होती. शेताच्या वरच्या बाजूला असल्याने सगे शेत दिसत असे. आणि
तालुक्याच्या इमारती पण दिसत. तिथे बसून सुद्धा शेताच्या सगळ्या भागात काय
चालू आहे हे समजत असे. टेकडीवर थोडे वेगळे गवत होते. त्याला पांढरे तुरे
होते. थोडासा खडक उघडा होता.. एकदम कला असा तो खडक बसायला छान होता. त्यावर
आम्ही जेवायला बसायचो. टेकडीवरून सरळ एक पायवाट विहिरीवर जात होती.
त्याच्या बाजूने पावसाळ्यात खूप पाण्याने वाहून गेलेलं जमीन स्पष्ट
दिसायची. पाण्याचा ओहोळ होता तो. तसाच एक ओहोळ शेताच्या डाव्या बाजूने येऊन
विहीरीवर येत असे मग दोन्ही मिळून पुढे जाऊन त्याची विहीरीवर ओघळ तयार
झाली होती. त्याच्या संगमाजवळ मोठे आंब्याचे झाड उभे होते. आजोबांनी
भाऊंनी, आबांनी मिळून येणारे पाणी विहिरीच्या वर थांबेल आणि जास्त झालेले
मनी ओघालीला वाहून जाईल अशी व्यवस्था केली होती. आणि खरच पाणी
त्याप्रमाणेच वाहत असे. पावसाळ्यात खूप पाणी आले तरी जेमतेम पाणी साठत असे
बाकीचे वाहून जात असे. कधीही विहिरीवर जादा पाणी झाले नाही आणि
शेती वाहून गेली नाही. कारण व्हीरीला लागून मोठी डोक्या इतकी उंच ताल
धरली होती, माळा आठवते तसे त्यावरून कधीच पाणी गेले नाही.. विहिरीच्या
बाजूने पाणी निघून जात असे. पुढे जाऊन परत विहिरी मध्ये उतरत असे पण ती ताल
नाही फुटली.
आता पाऊस चालू होऊन दोन महिने उलटले तरी कमी झाला नव्हता. दिवसातून
चार वेळा तरी तो पडत होता आणि सगलिअक्दे पाणीच पाणी होत होते. विहीरी च्या
वरच्या भागात चार मोठ्या ताली होत्या त्यामध्ये पाणी भरून मग खाली येत
असल्याने पाणी उशिरा येत असे आणि जास्त वेळ वाहत असेल. पाऊस उघडला तरी पाणी
चालू असे.
विहिरील्या जोडलेल्या तालीवरून विहिरीचे पाणी बागायती मध्ये जात असे.
तालीच्या खाली सगळी काळी बागायती जमीन होती. माझे आजोबा सांगायचे खालच्या
जमिनीमध्ये बटाटे आणि उस असायचा . ... आता फक्त भेंडी, रताळी, गाजर, गवार,
कांदा आणि भाजीपाला होता.
माळा आठवते त्यावाशी खूप पाऊस झाला तेव्हा कांदा काढून बाकीची गवार
शेतामध्ये इतकी वाढली होती आणि त्यामध्ये शेवरी वाढून जंगल तयार झाल होत.
गवारी आणि शेवरी, आधीचे दोडके भोपळे पसरून शेतामध्ये घुसता येत नव्हते.
असेच दोन महिने त्यात कोणी शिरले नव्हते. शेवरी जाडजूड होऊन उंच झाली होती.
त्यावर वेली चढल्या होत्या. त्याला कसली तरी फळे लागली होती .. मोठी
हिरवी, काही पिकलेली पिवळी लालसर झाली होती...
मला आठवते तेव्हा मी आणि माझे दोस्त पण खूप होते.. माझ्यासारखेच..
सगळे माझ्यापेक्षा लहान होते.. काही काम नसेल तरी ते माझ्याबरोबर फिरत.
अगदी जोड्या जोड्या ने फिरत असू. माझी पण एका सुंदर मुलीबरोबर जोडी
लावली होती.मजा यायची. तसी ती आली की मला खूप छान वाटायचे. तिला पण
माझ्याशी बोलायला जवळ बसायला आवडत होते. घरासमोरच्या झाडाला झोका कायमचा
बांधलेला होता. झाडावर फक्त मीच चढत असे. गुळगुळीत आणि ठिसूळ होते ते. मग
सगळे घबराट असत. मी वर चढून एकदाच दोरी बांधली होती. दोरीवर बसायला घरातला
मोठा लाकडाचा पाट ठेवून दुपारी आम्ही झोके घेत असू. एकदा मी झोक्यावर
बसलो असताना मैत्रीण आली. मग मी तिला झोक्यावर बसविले. पाट मोठा
असल्याने मी मागे बसलो आणि ती पुढे बसली. आणि एकदम दोरी तुटली.. मी तिला
अगदी मिठीत घेऊन पडलो. दोघानाही लागले नाही पण कुठेतरी ती आतमध्ये माझ्या
मनात रुतून बसली... तिच्याकडे माझे लक्ष नव्हते पण ती बावरली होते इतके
नक्की... त्यांचे घर मागे होते. त्याच्या पलीकडे पण घरे होती पण तीकडे
लहान मुले नव्हती. माझ्याकडे नवीन आणि जुनी अश्या दोन सायकली होत्या. मग
मी तिला एकदा सायकल शिकवत असताना खूप जवळ गेलो... कसेतरी झाले माळा आणि
तिला पण.. पण तिने नेहमीसारखी बोलून वेळ मारून नेली. मला मात्र ती आठवण
तसीच राहिली.
त्या वर्षी खूप पाऊस होता... खूप... ती सारखी माझ्या जवळ होती. मला
खूप आवडत होती. तिच्यासाठी मी काहीही करत असे. तिला नाचायला खूप आवडायचे.
मग मी त्यवेळी नवीन आलेला "दाग दि फायर" ची cassaeette आणली. त्यामधील
"प्यार हमे प्यार तुम कितना करते हो" हे तिला आवडत होते आणि त्यावर ती खूप
नाचायची... मला तर अजून कुठे ते एकले की तिची आठवण येते.. "दिल दिवाना ना
जाने कब खो गया" आणि मी पण सगळ विसरून तिच्या आठवणीत जातो... उन्हाळ्यात
सगळ्यांना सुट्टी असायची. मग मी घरी रहायची बाकीचे शेळ्या चरायला आणि
कामावर जायचे. मी आणि माझे मित्र खेळत बसायचो.. मग त्यात क्रिकेट, जिबल्या,
लपाछपी, सूरपारंब्या, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पत्ते आणि चम्पुल्या.
सकाळी बसलो चम्पुल्या खेळायला कि चार कधी वाजत कळत नसे .. जेवायचे भान नसे.
त्यामध्ये मी आणि ती दोघे एका बाजूल आणि बाकीचे मित्र एका बाजूला तसे मी
आणि ती सगळ्या मोठे होतो.. म्हणजे आम्हाला चांगले कळत होते. मी अकरावीला
आणि ती नववी ला होती. तिला इंग्लिश ची शिकवणी लावली. माझ्या मोठ्या
बहिणीला थोडे खटकू लागले होते . म्हणजे मी मैत्रिणीला सायकल शिकवतो, आणि
इंग्लिश शिकवतो ते तिला आवडत नव्हतो कारण या दोन्ही कामात आम्ही दोघेच
कितीतरी वेळ बाजूला बसायचो.. बाकी खेळताना सगळे मित्र असायचे .
(आज असेच सकाळ पासून दोन वेळा पाऊस पडून गेला होता. आम्ही खूप वेडे
होऊन पुसत भिजलो होतो. विहिरीवर आणि आजूबाजूला निसर्गाने खूप छान रूप धारण
केले होते. सगळीकडे गवत, पाने फुलें, त्यावर फुलपाखरे, आणि विहिरीतून
बाहेर जाणारे स्वच्छ पाणी त्यावरून फिरणारे मासे.. असे खूप सुंदर आणि थंड
वातावरण होते. सगळे मित्र बाजूच्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही बसलो
होतो, ती पण माझ्या जवळ अगदी जवळ बसली होती.. आज जरा जास्तच जवळ होतो
आम्ही. दुपार houn गेली होती. अचानक अंधारून आले आणि जोराचा पाऊस येणार असे
वाटले. पाऊस सुरु होण्यापूर्वीच सगळे मित्र घराकडे पळत सुटले. ती आणि मी
नाही गेलो...पाऊस सुरु व्हावा आणि असेच भिजावे?.. काय वाटत होते तिला आणि
मला?. अगदी जवळ बसलो होतो. खूप लहान होतो आम्ही. मनामध्ये काहीच नव्हते.
पाऊस आला पण थोडाच. नेहमी जोरात कोसळणारा पाऊस आज संथ कोसळत होता. पाऊस
पाहून आडोशाला, घरी पळून जाणारा मी आज पाऊस अंगावर पडू लागला तरी सावध झालो
नव्हतो. तिने हळूच माझा हात हातात घेतला आणि जवळ ओढून घेतले. कशी घट्ट
बिलगली होती मला ती.... मला दिसत होते तिच्या केसातून गालावर ओठावर
पावसाचे थेंब ओघळत होते. मोत्यासारखे वाटणारे थेंब अलगद पिऊन टाकावे वाटत
होते. तिने डोळे आधीच बंद केले होते. अगदी घट्ट मिठीत होतो मी तिच्या आणि
ती माझ्या, मुंगीलाही शिरायला जागा नव्हती.. ओले केस माझ्या हातावर पसरलेले
होते. गोऱ्या गालावर लालसर ओठावर मोती ओघळत होते. कितीतरी वेळ ती
तसीच होती.. मग हळूच मिठी सैल झाली.
डोळे उघडून माझ्याकडे पाहत होती. तिचे डोळे खूप काही सांगून जात
होते.. मिठीतून सुटून आंब्याच्या झाडाला चिकटून आडोशाला उभी राहिली..
माझ्याकडे बघत होती.. जसी मला जवळ बोलावत आहे.. मी ओढीने जवळ गेलो आणि
आडोशाला उभा राहिलो.. तिच्याकडे बघत,, आता मी पण पूर्ण भिजलो होतो तिच्या
प्रेमात कि पावसात कळत नव्हते... इतके दिवस फक्त थोडासा स्पर्श, गप्पा,
जवळीक आज ती ओल्या केसात, कपड्यात मला खूप काही देऊन जात होती. थंडीने थोडी
काकडली होती ती,, माझ्या आगदी जवळ खेटून उभी राहीली . तिला उब वाटत असावी.
. मला पण उब जाणवत होती. पाऊस पडताच होता.. सूर्य अजून खूप वर
असल्याने चांगलं प्रकाश होता.. तिच्या आणि माझ्यावर छान प्रकाश पडल्याने
उजळून दिसत होतो आम्ही. तिचा हात माझ्या हातात होता. मी तिचा दुसरा
हात हातात घेताच तिने परत डोळे बंद केले... मला जणू इशाराच होता तो.. तिचे
लालबुन्ध ओठ आणखी लाल झाले होते.. केसातून डोळ्यावरून नाकावरून
एक पाण्याचा थेंब हळूच ओठावर येऊन थांबला होता,.. खूप वेळ तो तसाच पाहून
मी हळूच त्याला स्पर्श केला.. तिचे ओठ थरथरले . केसातून ओठापर्यंत मी हात
फिरवला तिने मला घट्ट मिठीत घेतले.. आता ती खूप जवळ आली होती खूप...
...वरून पडणारे पाणी सर्वाग्नाला भिजवून टाकत होते.. मिठी घट्ट होतो
होती... तिच्या ओठावरील मोत्यासारखे वाटणारे थेंब पिण्यासाठी तिच्या ओठावर
माझे ओठ टेकवले... )
No comments:
Post a Comment